Fit and Fine; आरोग्यासंबंधी पुरुषांसाठी खास Diet plan

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । .एका विशिष्ट वयानंतर आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू लागतात. यात प्रामुख्याने मधुमेह, वाढते वजन, पचनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणं यांचा समावेश होतो. या वयानंतर हृदयासंबंधी विकार जडण्याची शक्यता असते. पण वाढत्या वयातील आरोग्य म्हटलं की फक्त महिलांच्या आरोग्याचा विचार केला जातो. पण महिलांप्रमाणेच पुरुषांनीही (Men health) आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. विशेषतः चाळीशीनंतर महिलांप्रमाणेच पुरुषांनीही आपलं आरोग्य (Health after age of 40) जपायला हवं.

कोरोना काळात स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवण्याचं महत्त्व समजलं आहे. शरीर फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली (LifeStyle) आणि पोषक आहार (Healthy Diet) या बाबी महत्त्वाच्या आहेत. जर तुमचं वय 40 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला तुमच्या आहार आणि आरोग्याकडे लक्षं देणं आवश्यक आहे. 40 वर्षांवरील पुरुषांनी स्वतःला फिट ठेवण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे.

चाळीशीनंतर तुम्ही तुमच्या जीवनशैली आणि आहारात काही बदल केले तर तुम्ही नक्की फिट राहू शकता. त्यामुळे जाणून घेऊया वयाच्या चाळीशीनंतरही फिट राहण्यासाठी आहार कसा असावा.

वय वर्षे 40 नंतर असा असावा पुरुषांचा डाएट प्लॅन

शरीर फिट ठेवण्यासाठी हायड्रेटेड (Hydrate) राहणं आवश्यक आहे. त्यासाठी दिवसभरात किमान 3 लीटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. साध्या पाण्यासह तुम्ही नारळपाणी, ज्यूस किंवा हर्बल टीचे सेवन करू शकता. पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करतं.तंतुमय पदार्थ (Fiber) शरीरासाठी फायदेशीर असतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. या पदार्थांच्या सेवनामुळे वजन आटोक्यात राहते. यासाठी तुम्ही आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. फायबरमुळे कोलेस्ट्रॉल पातळी आणि ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतं. यासाठी आहारात ब्रोकोली, कोबी, अक्रोड, कडधान्य, ग्रीन टी आणि बेरीचा समावेश करावा. या पदार्थांमध्ये ओमेगा 3 (Omega3Fats) देखील असतं. यामुळे कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

संपूर्ण दाणेदार धान्य खा
या धान्यात प्रामुख्याने ओटस, दलिया, लाल तांदूळ यांचा समावेश होतो. हे धान्य सेवन केल्यास दिवसभर तुम्हाला चांगली ऊर्जा मिळू शकते. तसंच या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी देखील असते. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

प्रोटीन आहेत आवश्यक
आपल्या आहारात सोयामिल, सोया टोफू या प्लांट बेस्ड प्रोटीनचा समावेश करावा. त्या व्यतिरिक्त मटण, चिकन, अंडी, मासे किंवा सुकामेवा जरूर सेवन करा. मात्र वजन लक्षात घेऊन हे पदार्थ सेवन करणं हिताचं ठरेल.

या गोष्टींपासून दूर रहा
फ्राईड आणि पॅकेज्ड फूड पासून दूर रहा. कारण या पदार्थांच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल आणि बीपीची समस्या निर्माण होते. तसंच धूम्रपान आणि मद्यसेवन पूर्णपणे बंद करा. कारण यामुळे कॅन्सर तसंच लिव्हरशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *