महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे ।व्हॅक्सिनेशन हेच कोरोनाशी लढण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले जात आहे, परंतु भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात प्रत्येकाला इतक्या लवकर लस देणे शक्य नाही. या दरम्यान, कॅनेडियन कंपनी ‘सॅनोटाईज’ चा एक नोझल स्प्रे जगभरात चर्चेचा विषय होत आहे. सेनोटाइजचा असा दावा आहे की, हा स्प्रे ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील क्लिनिकल ट्रायलमधून गेला आहे, ज्यामध्ये तो 99 टक्के प्रभावी ठरला आहे.
कंपनीचा दावा हवा-हवाई नसून टेस्टच्या निकालावर आधारित आहे. नोझल स्प्रेची टेस्टिंग आम्ही आमच्या लॅबमध्ये केल्यानंतर त्याचा मॅन्युफेक्चरिंग फॉर्मुला यूएसच्या यूटा स्टेट युनिव्हर्सिटीला (Utah State University) पाठवला. तेथे विद्यापीठाच्या अँटी व्हायरल इंस्टीट्यूटने लॅब टेस्ट केल्यानंतर हा 99 नाही तर 99.9% प्रभावी असल्याचे सांगितले.
आम्ही जगातील सर्वात चांगली आणि विश्वासार्ह पद्धती ‘डबल ब्लाइंड प्लेसबो कंट्रोल’ वापरली. त्यासाठी दोन गट तयार केले गेले. एका ग्रुपला प्लेसबो म्हणजेच सामान्य नोझल स्प्रे देण्यात आला आणि दुसर्याला सॅनोटाईज नोझल स्प्रे देण्यात आला. गटातील कोणालाही काय देण्यात आले ते माहिती नव्हते. आम्हाला यामध्ये असे आढळून आले की, 24 तासांच्या आत सॅनोटाईज नोझल स्प्रेचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये 95% पर्यंत व्हायरल लोड कमी झाला. यासोबतच 3 दिवसाच्या आत व्हायरल लोडमध्ये 99 टक्क्यांनी घट झाली. हे सर्व कोविड पॉझिटिव्ह लोक होते. हा निकाल जागतिक स्तरावर प्रसिद्ध ‘जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. आहे, ज्यामध्ये तो 99 टक्के प्रभावी ठरला आहे.