या राशीवर असेल लक्ष्मी चा वरदहस्त ; पहा आजचे राशिभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे ।

मेष : आज नशिबाची साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कामात उत्साह, उमेद वाढेल. व्यवसायात जिद्द व चिकाटी दाखवा . आर्थिक आवक वाढेल.

वृषभ : आजचा दिवस सामान्य राहील , आर्थिक व्यवहारांबाबत दक्ष राहण्याची गरज. जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य ठीक असेल .

मिथुन :आजचा दिवस धावपळीत जाईल. शारीरिक आणि मानसिक दमछाक होईल. आर्थिक आवक वाढेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कर्क : आज स्वयंभू राहाल ,कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. विरोधकांवर मात कराल. आज तुम्ही व्यवहारीपणे वागाल, याचा फायदाही होईल. बाकी दिवस उत्तम असेल.

सिंह : आज आरोग्य चांगले राहील , तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल .आयुष्यात नवे बदल घडतील. नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील. नवी गोष्टी शिकायला मिळतील.

कन्या : आज प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. तब्येत ठीक राहील , तुम्ही आज सहानुभूती आणि लवचिकतेने विचार कराल.

तुळ : आज दिवस उत्तम आहे , जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.चांगले बोलून कार्यभाग साधता येईल. निस्वार्थी भावनेने इतरांना मदत कराल.

वृश्‍चिक : आज काहींना धनलाभाची शक्यता आहे. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. धावपळ करू नका . दिवस आनंदात जाईल. स्वत:मध्ये काही बदल करण्याचे ठरवाल. पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होईल.

धनु : आज आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शांती मिळेल , उद्योग व्यवसाय साठी दिवस चांगला ,व्यवसायात नशिबाची साथ लाभेल. आर्थिक आणि रोजगाराच्या स्तरावर चांगल्या बातम्या कानावर पडतील.

मकर :आजच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. आज आरोग्य ठीक असेल , काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दानधर्मासाठी खर्च कराल.

कुंभ : आज दिवस चांगला असेल , नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता. नव्या लोकांच्या गाठीभेटीतून प्रेरणा मिळेल.

मीन : आज वादविवाद टाळावेत. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.दुसऱ्यांचा सल्ल्याचा विचार करा, कामकाजाकडे गांभीर्याने पाहा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *