जगात मिळेल तिथून म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे । काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) (Mucormycosis) संसर्गाच्या (Infection) उपचारांसाठी (Treatment) लागणारे लिपोसोमल अँफोटेरेसिन-बी हे इंजेक्शन आणि इतर औषधांचा पुरवठा (Medicine Supply) पुरेशा प्रमाणात होण्यासाठी, जगात मिळेल तिथून ही औषधे युद्धस्तरावर रातोरात मागवावीत, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिले. (Order Mucormycosis Medications from Anywhere Narendra Modi)

दुसऱ्या लाटेवेळी झालेल्या चुकांमधून धडा घेऊन, नव्या रोगाची औषधे कोणत्याही परिस्थितीत कमी पडू नयेत यादृष्टीने सरकारने युद्धपातळीवर हालचाली केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या अनेक राज्यांत काळ्या बुरशीच्या रोगाने हातपाय पसरले आहेत. याची रुग्णसंख्या ११,७१७ हजारांचा आकडा ओलांडून गेली आहे. कोरोनापाठोपाठ आलेल्या या संसर्गाशी लढण्यासाठी अँफोटेरेसिन-बी इंजेक्शनचा व अन्य औषधांचा तुटवडा कोणत्याही स्थितीत जाणवता कामा नये, असे पंतप्रधानांनी बजावले आहे. केंद्राने आणखी पाच कंपन्यांना याच्या उत्पादनाचा आपत्कालीन परवाना मंजूर केला आहे. पंतप्रधानांनी दररोज यासंदर्भात अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय चर्चा सुरू ठेवली असून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मिळाले तरी हे औषध घेऊन यावे. प्रसंगी त्यासाठी आपण स्वतः जागतिक नेत्यांबरोबर बोलू, असे मोदी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *