लॉकडाउनचा फटका ; लाखो रुपयाचे टरबूज मातीमोल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ मे । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा Corona Second Wave मोठा फटका शेतकऱ्यांना Farmers देखिल बसला आहे. लाखो रुपये खर्च करून पिकवलेले टरबूज watermelon लॉकडाऊनमुळे Lockdown शेतातच पडून आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावून पिकवलेले टरबूज watermelon मातीमोल झाले आहे. हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात financial crisis सापडला आहे. शेतकऱ्याला Farmers सरकारने मदत करावी अशीच मागणी टरबूज watermelon पीक उत्पादक शेतकरी करत आहेत. (Loss of watermelon crop due to lockdown)

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावातील भगवान गडाख या शेतकऱ्याने दीड एक्कर टरबुजाची लागवड केली होती. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे टरबूज वाढवले होते. टरबूज काढणीला आले होते आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजार समिती आठवडे बाजार ही बंद झाल्यमुळे आता टरबूज कुठे विकावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतातील टरबूजांची नासाडी होत आहे. तसेच काही टरबूज हात विक्रीने विकले आहेत.

परंतु टरबुजचे पीक मोठ्या प्रमाणत असल्याने टरबूज सडू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी टरबूज जनावरांना चरायला टाकले. गडाख या शेतकऱ्याने दीड एकर टरबूजाच्या पिकावर जवळपास दीड लाख रुपये खर्च केलेला आहे. शेतकऱ्यांचा पिकांवर झालेला खर्च देखिल निघत नसल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *