महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ मे । कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी DRDO ने डॉ. रेड्डील लॅबोरेटरीसोबत मिळून 2DG, हे पावडर स्वरुपातील औषध तयार केले आहे. आज डॉ. रेड्डीजने 2DG च्या एका पाउचची किंमत ठरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2DG च्या एका पाउचची किंमत 990 रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांसह सरकारी रुग्णालयांना याच्या किमतीत सवलत मिळणार आहे.
2-DG औषधाला डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर्गेनायजेशन (DRDO) च्या लॅब इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिनने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीसोबत मिळून तयार केले आहे. सुरुवाती चाचण्यांनंतर है औषध दिल्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन देण्याची गरज नसल्याचे सिद्ध झाले आहे.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मे महीन्याच्या सुरुवातील ड्रग 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG) ला आपातकालीन मंजुरी दिली होती. त्यावेळी सांगण्यात आले होते की, है औषध दिलेल्या रुग्णांची RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. या औषधामुळे रुग्णाच्या शरीरातील संक्रमणाचा वेग थांबवून रिकव्हर होण्यास मदत मिळते.
एप्रिल 2020 मध्ये कोविड -19 महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान, INMAS-DRDO च्या संशोधकांनी हैदराबादच्या सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB) च्या मदतीने 2-DG वर लॅबमध्ये परीक्षण केले होते. स्टेंडर्ड ऑफ केयर (SoC) मानकाशी तुलना केल्यास, इतर औषधांच्या तुलनेत या औषधाने रुग्णांना अडीच दिवस आधी ठीक केले आहे.
17 हॉस्पिटलमधील 110 रुग्णांवर झाल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या DGCI ने मे 2020 मध्ये कोरोना रुग्णांवर 2-DG च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या होत्या. ऑक्टोबर 2020 पर्यंत चाललेल्या चाचण्यांमध्ये 2-DG सुरक्षित सिद्ध झाले. हे औषध घेतल्यानंतर रुग्णांमध्ये रिकव्हरी चांगली दिसली. फेज-2 ट्रायल A आणि B फेजमध्ये केले. यात 110 कोरोना रुग्णांना हे औषध देण्यात आले.
डिसेंबर 2020 पासून मार्च 2021 पर्यंत 220 कोरोना रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यात आल्या. हे ट्रायल दिल्ली, यूपी, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि तमिळनाडुतील 27 रुग्णालयांमध्ये केले. या ट्रायलमध्ये रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.