लवकरच भारतात येणार कोरोनावरील नेजल स्प्रे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ मे । कॅनडाची कंपनी सॅनोटाइजने नाकात टाकला जाणारा स्प्रे तयार केला असून तो 99.99 टक्के कोरोना विषाणू संपवत असल्याचा दावा केला आहे. भारतासारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या देशात केवळ लसीकरणाने मदत मिळणार नाही, तेथे अशा नेजल स्प्रेची गरज देखील भासणार आहे. आमचा नेजल स्प्रे ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, इस्रायल आणि न्यूझीलंडमध्ये वैद्यकीय परीक्षणात यशस्वी ठरला आहे. लवकरच हा नेजल स्प्रे भारतात सादर करणार आहोत असे कंपनीने सांगितले आहे.

नेजल स्प्रे हवेतच कोरोना विषाणू नष्ट करण्यास सुरुवात करते. याचबरोबर नाकाच्या मार्गे फुफ्फुसांपर्यंत विषाणू नष्ट करते. स्प्रेच्या परीक्षणात भाग घेतलेल्या लोकांच्या शरीरात 24 तासांत विषाणूंचे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत कमी झाले. तर पुढील 72 तासांमध्ये 99 टक्क्यांपर्यंत विषाणूंचे प्रमाण कमी होत असल्याचे सॅनोटाइजने म्हटले आहे.

उपचाराधीन रुग्णांना लाभदायक नेजल स्प्रेचा वापर संक्रमणापूर्वी, संक्रमणादरम्यान आणि संक्रमणानंतरही केला जाऊ शकतो. यात कुठलाही दुष्परिणाम होत नाही. संक्रमणापासून बचावासाठी याचा वापर दिवसात दोनवेळा केला जाऊ शकतो. तर उपचाराधीन रुग्ण 4-5 वेळा याचा वापर करू शकतात. गंभीर रुग्णांनी हा नेजल स्प्रे वापरावा की नाही याचा निर्णय डॉक्टर घेतील असे गिली यांनी म्हटले आहे. नाकावाटे दिली जाणारी लस सर्वसामान्य लसींपेक्षा अधिक प्रभावी असते. कारण ही लस शरीरात ज्या मार्गाने विषाणू प्रवेश करतो तेथेच विषाणूवर हल्ला करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *