पुण्यात मेकॅनाईज्ड रोड स्वीपर्सने रस्त्यांची सफाई करण्यावर भर ; रस्ते होणार धूळ विरहित;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ मे ।पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, शहराची साफसफाई करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर देण्याचं नियोजन महापालिकेनं केलं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune News) 480 किमीच्या रस्त्यांची सफाई मेकॅनाईज्ड रोड स्वीपर्सच्या (mechanized road sweepers) माध्यमातून केली जात आहे. पुणे शहराला धूळमुक्त करण्याचा मानस ठेवून मेकॅनाईज्ड रोड स्वीपर्सने रस्ते स्वच्छ करण्याचं नियोजन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. त्याचबरोबर आदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्या क्लीन सिटी उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यातील 600 किमीच्या रस्त्यांची सफाई स्ट्रीट व्हॅक्युम क्लीनरच्या (Street Vacuum Cleaner) माध्यमातून सफाई केली जाते.

त्यामुळे आता येत्या काळात पुण्यातील मुख्य रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी होताना दिसू शकते. सध्या गणेशखिंड रस्ता, नगर रस्ता, विमानतळ रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सेनापती बापट रस्ता, बाणेर रस्ता, सोलापूर रस्ता या रस्त्यांची स्वच्छता मेकॅनाईज्ड रोड स्वीपर्सच्या मदतीनं केली जात आहे. भविष्यात अन्य लहान रस्त्यांवर देखील मेकॅनाईज्ड रोड स्वीपर्सच्या माध्यमातून सफाई करण्याचा मानस महापालिकेचा आहे. त्यासाठी कमी क्षमतेची वाहने खरेदी करण्याबाबतही महापालिका विचार करत आहे.

महापालिकेकडे सध्या एकूण 12 मेकॅनाईज्ड रोड स्वीपर्स असून एका तासांत पाच किमी अंतर स्वच्छ करण्याची याची क्षमता आहे. त्यामुळे रात्री सलग आठ तास रस्ते स्वच्छ करण्याचं काम केलं जात. या 12 वाहनामार्फत दररोज तब्बल 480 किमीचे रस्ते स्वच्छ केले जातात. त्यामुळे एका व्यक्तीसाठी दिवसभर करावं लागणार काम या यंत्राच्या साहाय्याने एका तासांत केलं जात आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्नही मार्गी लागताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रदूषण कमी होण्यासही मदत होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *