राशीभविष्य | ‘या’ राशीच्या व्यक्तीना आज दिवस खास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३० मे ।

मेष- आज घर, जमीनीबद्दल काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचं व्यक्तीमत्व आकर्षक राहील. मनात आलेल्या शंकांचे निराकरण होईल.

वृषभ- आज येणाऱ्या चांगल्या दिवसांसाठी बेत आखू शकाल. मेहनतीचे फळ चांगले असेल, विचार केलेली कामे लवकर पूर्ण होतील.

मिथुन- आज धैर्य ठेवा त्याचप्रमाणे प्रयत्न चालू ठेवा. धनलाभ हेण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळेल.गोंधळात अडकलेल्या परिस्थितीतून चांगला मार्ग निघण्याची शक्यता आहे

कर्क- आज काही चांगले आणि महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे व्यापारामध्ये इतरांचा सल्ला मिळेल. धनलाब होण्यची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह – आज नोकरी बदलण्याच्या किंवा जास्त कमाई करण्याच्या मार्गांचा विचार करु शकता. यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही बाबतीत अचानक फायदा मिळेल.

कन्या- आज व्यवसायात सावध राहा. जी कामं हाती घ्याल त्यात यश मिळेलच असं नाही. व्यापाराच्या निर्णयांमध्ये कोणाचा सल्ला घ्या.वरिष्ठांचं सहकार्य तसं कमीच मिळेल. एकटेपणापासून दूर राहा.

तुळ- आज विवाहीत लोकांना जीवनसाथीकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी काही लोकांकडून मदत मिळेल. चांगली बातमी मिळेल. कामात व्यस्त राहाल.

वृश्चिक- आज नविन शिकण्यात रस राहील. स्वत:वर संयम ठेवा. मनात चांगले विचार येतील. विश्वासातील लोकांकडून सल्ला घ्या. त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. प्रतिभा सिद्ध करण्यात यशस्वी रहाल. विचार केलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

धनु- आज नवीन वस्तू विक्री करण्याचे योग आहेत. व्यवसायात कुटुंबाकडून मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता.अडचणींमधून मुक्त व्हाल. नवीन तंत्रज्ञानामुळे तुमचे काम सुखकर हेईल.

मकर- आज व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही नव्या कल्पना मिळतील. उत्साह वाढेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जुन्या अडचणी दूर होतील. परिस्थिती अनुकूल असेल. अडकलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. साथीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे.

कुंभ- आज अपत्यांकडून सुख मिळेल. कामात यश मिळेल. वरिष्टांकडून कामाचे कैतुक होईल. नोकरीपेक्षा व्यवसाय करणारे लोक जास्त संतुष्ट राहतील. इतरांना मदत करण्याची संधी मिळेल.

मीन- काही प्रसंगी अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. अत्मविश्वास वाढेल. आजुबाजूचे लोक तुमचं कैतुक करतील.धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *