महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ मे । भारतीय डाक विभागाकडून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. ही श्रद्धांजली अनोख्या पध्दतीने वाहिली जाणार आहे. पुण्यतिथी दिनी भारतीय डाक द्वारा त्यांची प्रतिमा असलेल्या तिकिटाचे प्रकाशन थेट दिल्लीवरून होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा गोपीनाथ गडावर ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार आहे.
यंदाच्या पुण्यतिथी दिनी भारतीय डाक विभागाकडून गोपीनाथ मुंडेंचा त्यांचे छायाचित्र असलेल्या तिकिटाचे प्रकाशन करत गौरव केला जाणार आहे. हे उदघाटन कोणाच्या हस्ते होणार याबद्दल माहिती भेटू शकली नाही. हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. याआधी राष्ट्रसंत भगवान बाबा, यशवंतराव चव्हाण, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशा महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींच्या तिकिटाचे प्रशासन भारतीय डाक कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे.