1 जूनला बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स देशभर ‘काळा दिवस’ साजरा करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३० मे । गेल्या काही दिवसांपासून अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरून योग गुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये (आयएमए) वाद सुरू आहे. निवासी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की, अ‍ॅलोपॅथीविषयी बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानाविरोधात 1 जून रोजी देशव्यापी निषेध करण्यात येणार असून हा काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे. तसेच, याबाबत बाबा रामदेव यांनी ‘जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी’, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. (doctors hold a nationwide black day protest on 1st june against ramdev allopathy remarks)

 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड राज्यातल्या शाखेने बाबा रामदेव यांच्याविरोधात अलोपॅथी व अलोपॅथी चिकित्सेवर अवमानकारक टीका केल्याप्रकरणी एक हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या संदर्भातील एक नोटीस इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना धाडली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे उत्तराखंड शाखेचे सचिव अजय खन्ना यांनी 6 पानांची एक नोटीस बाबा रामदेव यांना पाठवली असून त्यात अलोपॅथीचे 2000 डॉक्टरांची प्रतिष्ठा व त्यांच्या प्रतिमेवर रामदेव बाबा यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *