महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३० मे ।दी अॅडव्हर्टायझिगं स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियाने नुकतीच डिजिटल माध्यमांवरील इन्फ्लुएन्सर जाहिरातबाजीसाठी अंतिम मार्गदर्शक तत्वे जारी केली. मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा फेब्रुवारीमध्ये प्रथम जारी करण्यात आला आणि जाहिरातदार, एजन्सरी, इन्फ्लुएन्सर्स व ग्राहक अशा सर्व संबंधितांकडून याबाबत प्रतिक्रिया मागवण्यात आल्या.
ही प्रक्रिया सहयोगात्मक राहावी तसेच यामध्ये तज्ज्ञांचाही सहभाग असावा हे निश्चित करण्यासाठी एएससीआयने बिग बँग सोशल या सोशल स्टोरीटेलिंगसाठीच्या आघाडीच्या बाजारपेठेशी भागीदारी केली. याद्वारे हिंदुस्थानातील आघाडीच्या डिजिटल इन्फ्लुएन्सर्सची मते जाणून घेता आली.
14 जून 2021 रोजी किंवा त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या व्यावसायिक संदेशांना किंवा जाहिरातींना ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इन्फ्लुएन्सर्सना ते पोस्ट करत असलेल्या प्रमोशनल कंटेन्टवर तसे लेबल लावणे अनिवार्य आहे.
ही मार्गदर्शक तत्त्वे कंटेन्ट आणि प्रमोशनल जाहिराती यांमधला भेद स्पष्ट करण्यास साहाय्यभूत ठरतील.