शुभमन गिलनी फलंदाजीतील ही त्रुटी काढून टाकावी ; ऑस्ट्रेलियन खेळाडूचं मोठं भाष्य,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । भारताचा युवा क्रिकेटपटू सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) यानं अगदी अल्पावधीतच आपल्या कौशल्यानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याद्वारे भारतीय क्रिकेट कसोटी संघात (Indian Cricket Test Team) पदार्पण करणाऱ्या शुभमननं बहारदार खेळी करत त्याची निवड सार्थ ठरवली. मात्र त्यानंतर भारतातच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या (England) मालिकेत त्याने फारशी चांगली खेळी केली नाही, त्यामुळं त्याच्या फॉर्मवर शंका निर्माण झाली आहे. आगामी इंग्लंड दौर्‍यात त्याची कामगिरी सुधारणार का अशी चर्चा होत आहे. वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल (WTC Championship) आणि पाच कसोटी सामन्यांचं आव्हान आता शुभमनसमोर आहे. हा दौरा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी स्पिनर (Former Spinner) ब्रॅड हॉगनं (Brad Hog) शुभमन गिलच्या बॅटिंगमधील (Batting) एक उणीव निदर्शनास आणली असून, त्यावर काम करण्याची गरज व्यक्त केली आहे. ब्रॅड हॉगच्या मते, शुभमन गिल मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे; पण त्याच्या बॅटिंगमधील एक त्रुटी आहे ज्यावर त्यानं काम करण्याची गरज आहे.

टाइम्स नाऊशी संवाद साधताना ब्रॅड हॉगनं सांगितलं की, ‘एक बॉलर म्हणून शुभमन गिलच्या बॅटिंगमध्ये एक त्रुटी आहे हे मी सांगू इच्छितो. शुभमन गिलला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल मारण्याची संधी दिली तर तो एक प्रकारचा हाफ कट आणि हाफ बॅकफूट ड्राइव्ह खेळतो. त्याच्या बॅटिंगमध्ये मला ही मोठी त्रुटी वाटते. अर्थात तो याच शॉटवर भरपूर रन्स काढतो हे ही खरं आहे. शुभमनची खंबीर वृती आश्चर्यकारक आहे. मी स्वतः त्याच्या या वृत्तीचा चाहता आहे. सध्या तो रोहित शर्माबरोबर बॅटिंग करत आहे. ही जोडी चांगली जमली आहे. ती जोडी फोडू नये असं मला वाटतं. या वेळी काय करायला हवं याची शुभमनला जाणीव आहे, असं मला वाटतं.’

अलीकडेच भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत शुभमननं 19.83 च्या सरासरीनं केवळ 119 रन्स केल्या. तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो चांगलाच फ्लॉप ठरला. सात सामन्यांमध्ये 18.85च्या सरासरीनं तो केवळ 132 धावाच करू शकला. फॉर्म खराब असतानाही शुभमन इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार असल्यानं या दौऱ्यात त्याची कामगिरी कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय संघातील आपलं स्थान टिकवण्यासाठी शुभमनला या दौऱ्यात चमकदार कामगिरी करणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *