पुण्यात लॉकडाऊनच्या नियामवलीत बदल, ; महापौर मुरलीधर मोहोळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । पुण्यात (Pune Lockdown) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावलीही पुण्यात लागू झाली आहे. त्यामुळे, स्पा, सलून आणि जिम सुरू ठेवण्याचा निर्णय आता मागे घ्यावा लागला आहे, अशी घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. त्यामुळे पुण्यात अनेक दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुणे मनपा हद्दीत सलून, पार्लर, स्पा, जिम सुरू करण्याचा निर्णय सुद्धा महापालिकेनं घेतला होता. परंतु, आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून आणि पार्लर बंद ठेवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

 

तसंच, परदेशी शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे मनपा हद्दीतील शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण लसीकरणाचा स्पेशल ड्राईव्ह आयोजित केला असून आज पहिल्या दिवशी 220 जणांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.

दरम्यान, पुणे आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धक्क्यातून सावरत आल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात मंगळवारी कोरोनाचे नवे 384 रुग्ण आढळल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा इथंही कमी झाला आहे. तर पुणे शहरातील मृतांचा आकडा 39 आहे. त्यापैकी 28 पुण्यातील आणि 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. मंगळवारी 858 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर सध्या 5518 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काय आहे नवी नियमावली-

-पुणे शहरातील लॉकडाऊनला 60 दिवस झाले असून कोरोनाही आटोक्यात आला आहे. आता पुन्हा अनलॉकच्या दिशेने जात आहे.

-पुण्यात सकाळी 7 ते 2 पर्यंत सर्वप्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत.

-शनिवार, रविवारी माञ फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहिल

-उद्याने, हॉटेल बंद राहणार, फक्त पार्सल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहिल

-पण तरीही यापुढे नियम पाळावेच लागतील

-पुढच्या दिवसांसाठी ही शिथिलता असेल, नंतर पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल

-शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहणार

-मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरू राहणार

-शॉपिंग कॉम्पलेक्स बंदच राहणार

-पुण्यातील पावसाळी पूर्व कामं सुरूच आहेत, वेळेत लवकर पूर्ण करू

-लग्न, समारंभ, मेळावे बंदच असतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *