दिव्यांगाच्या टेम्पो जॅमरवर हातोडा ; मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा नवा कारनामा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून ।   पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पुणे अतिक्रमण विभागाने दिव्यांग व्यक्तीच्या टेम्पोला लावलेले जॅमर मोरेंनी हातोड्याने तोडले. खुद्द मोरेंनीच या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Pune MNS Corporator Vasant More breaks Tempo Jammer of Rickshaw with Hammer)

संबंधित दिव्यांग व्यक्ती टेम्पोच्या माध्यामातून आंबे आणि कलिंगड विकण्याचा व्यवसाय करत होता. मात्र अनधिकृत पद्धतीने गाडी लावत व्यवसाय करत असल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने छोटा हाथी टेम्पोला जॅमर बसवले. दिव्यांगाकडून याविषयची माहिती पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांना समजली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोला लावलेल्या जॅमरवर हातोडा मारला.

वसंत मोरे यांनी कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिल्याचं त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवर दिसतं. 27 वर्षांची तरुणी सिद्धी परदेशी अनेक दिवसांपासून अनेक आजारांनी ग्रस्त. त्यात भरीला भर कोरोनाने गाठलं. तिला पुण्यात बेड मिळाला नाही. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी तिला चाकणला बेड मिळवून दिला. या पोरांसारखे नगरसेवक जर पुणेकरांनी माझ्या साथीला 2022 ला निवडून दिले तर कोरोनासारख्या अडचणीलाही सहज हरवेन, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *