डेवॉन कॉनवेने 125 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला, लॉर्ड्स वर इतिहास रचला,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जून । न्यूझीलंडचा 29 वर्षीय सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Conway) डोंगराएवढे विक्रम मोडत आहे. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकाची चव चाखून इंग्लंड संघाच्या तोंडचं पाणी पळवलं. दुसऱ्या दिवशीही त्याने आपल्या रेकॉर्ड पुस्तकाला तिथूनच लिहायला सुरु केलं जिथे त्याने पहिल्या दिवशीशी अल्प विराम घेतला होता.न्यूझीलंडने पहिल्या दिवशी 3 बाद 246 धावा केल्या, त्यामध्ये लॉर्डसवर पदार्पण करताना डेवॉन कॉनवेने दमदार शतक ठोकलं होतं. (England vs New Zealand Devon Conway break 125 year old record Lords test)

125 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला…!
लॉर्डस कसोटीच्या दुसर्‍या दिवशी डेव्हन कॉनवेने 150 धावांचा टप्पा ओलांडला आणि 155 वी धाव घेताच तो इंग्लंडमध्ये पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 1896 सालचा के एस रणजितसिंग यांचा रेकॉर्ड कॉनवेने तोडले. 263 व्या चेंडूवर कॉनवेने हे यश मिळवलं.

अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज
पदार्पणाच्या सामन्यात 150 धावा ठोकणारा डेवॉन कॉनवे न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1999 मध्ये एम सिनक्लेअरने वेलिंग्टन कसोटीत 214 धावा केल्या, तर 2013 मध्ये एच रुदरफोर्डने 171 धावांची खेळी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *