…म्हणून मनसेच्या मोर्चाला माझ्या गाड्या- महेश लांडगे

Spread the love

महाराष्ट्र 24 – पुणे| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानपर्यंत धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चासाठी पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी भाजप आमदार महेश लांडगे यांचं नाव असलेल्या बसचा वापर केल्याने भाजपचा मोर्चाला पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं. यावर महेश लांडगे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

माझा वाहतुकीचा व्यवसााय आहे. मी कंपन्यांना बस पुरवत असतो. त्यामुळे माझी वाहनं हे कार्यकर्ते घेऊन गेले असतील. त्या कार्यक्रमाला जाणारे कार्यकर्ते हे भाजपचे आहेत की नाही हे मला माहीत नाही. पण तिथे जाणारा माणूस हा सीएएलाच समर्थन करत असल्यानं ते एका चांगल्याच कार्यक्रमाला गेले असल्याचं महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल तर माझी त्याला हरकत नाही. त्या काही भाजपच्या गाड्या नाहीत. तो माझा वैयक्तिक व्यवसाय असल्याचं लांडगे यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *