दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य, मोदी सरकारची मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य देणार असल्याची मोठी घोषणा मोदी सरकारनं केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज जनतेला संबोधित केलंय. त्यावेळी त्यांनी हे सांगितलंय. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटात काहीसा दिलासा मिळालाय. (Free Food To The Poor Till Diwali, Big Announcement Of Modi Government)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित करताना अनेक घोषणा केल्या. कोरोना साथीच्या संकटाच्या काळात सरकार गरिबांच्या मदतीसाठी उभे राहील. म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत 80 कोटींहून अधिक देशवासीयांना दरमहा निश्चित प्रमाणात मोफत धान्य मिळणार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलंय.

भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

येत्या 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील तर त्यांना 25 टक्के लसी उपलब्ध असतील. खासगी रुग्णालयात 150 रुपये भरून लस घेता येईल, असं मोदींनी स्पष्ट केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *