महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ जून । खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज घेतला. याप्रकरणी राणा यांना २ लाखांचा दंडही सुनावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी राणा यांचे जात प्रमाणपत्राविराेधात मुंबइई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठासमाेर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला.