अमेझॉनसह दिग्गज कंपन्यांच्या वेबसाईट बंद ; जगभरात इंटरनेट ठप्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । जगभरात इंटरनेट ठप्प झाल्यानं मोठ मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट्स क्रॅश झाल्याचं समोर आलंय. वेबसाईट्स क्रॅश होणाऱ्यांमध्ये Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk द गार्जियन, न्यूयॉर्क टाईम्स, बीबीसी, फायनान्शियल टाईम्स अशा अनेक लोकप्रिय वेबसाईट्सचा समावेश आहे. एका महत्त्वाच्या इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर सर्विस प्रोव्हायडरमुळे इंटरनेट ठप्प झाल्याचं बोललं जातंय (Internet down worldwide problem in opening of many websites showing error 503).

जागतिक माध्यमसंस्था न्यूयॉर्क टाईम्स आणि ब्रिटन सरकारची वेबसाईट देखील क्रॅश झालीय. या वेबसाईट्स लोडच होत नाहीयेत. त्यामुळे वापरकर्त्यांना सातत्याने वेबसाईटवर इरर दिसत आहे. क्लाऊड कम्प्यूटिंग कंपनी Fastly मुळे ही अडचण आल्याचं सांगितलं जातंय. ही कंपनी वेबसाईट्सला सर्व्हिस देते. वेबसाईटवर क्लिक केल्यावर तेथे एरर कोड 503 दिसतो आहे.

कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क (CNN) इंटरनेटच्या मुलभूत रचनेचा महत्त्वाचा भाग आहे. ही कंपनी वेब सेवांच्या सर्व्हरचं जागतिक नेटवर्क चालवते. याबाबत Tech Crunch ने फायनान्शियल टाईम्सच्या एका कर्मचाऱ्याचा आधार घेत इंटरनेटमधील हा बिघाड CDN (कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क) प्रोव्हायडर Fastly मुळे झाल्याचं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *