LPG ग्राहकांना आता कोणत्या डिस्ट्रिब्युटरकडून सिलेंडर रिफील करायचा हे तुम्ही ठरवणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जून । केंद्र सरकारकडून ग्राहकांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आता घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी (LPG customers) आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या ग्राहकांना आता एलपीजी गॅस सिलेंडर भरण्यासाठी (LPG Refill) गॅस डिस्ट्रिब्युटरची निवड स्वत: करण्याची सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा चंदीगड, कोयंबटूर, गुरुग्राम, पुणे आणि रांची येथील ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाईल, असे पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने (Ministry of Petroleum & Natural Gas) म्हटले आहे. या शहरांमध्ये ही योजना यशस्वी झाल्यास ती देशातील इतर शहरांमध्येही लागू केली जाईल.

LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 1 जूनपासून बदल करण्यात आला आहे. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 122 रुपयांनी कमी झाली आहे. तर गैर-सब्सिडीच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही कपात 19 किलोच्या सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे. मे 2021 मध्ये LPG गॅस सिलेंडरची किंमत 1,595.50 रुपये होती. इंडियन ऑइलच्या मते दिल्लीमध्ये आता ही किंमत 1473.5 रुपये झाली आहे.

मे 2021 मध्ये 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. याआधी एप्रिल 2021 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात केली होती. दिल्लीमध्ये आज LPG गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये आहे. जानेवारी 2021 मध्ये एलपीजी गॅसची किंमत 694 रुपये होती. फेब्रुवारीमध्ये हा दर वाढून 719 रुपये झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा 15 फेब्रुवारी रोजी दर वाढवून 769 रुपये करण्यात आले होते. यानंतर 25 फेब्रुवारी रोजी दर वाढवून 794 रुपये करण्यात आले होते. मार्च 2021 मध्ये झालेल्या वाढीनंतर एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव 819 रुपये झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *