महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जून । श्रीलंका विरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या मालिकेसाठी (India vs Sri Lanka) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय टीम या दौऱ्यावर तीन वन-डे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. अनुभवी शिखर धवन (Shikhar Dhawan) या टीमचा कॅप्टन असेल. या टीममध्ये 6 खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
या दौऱ्यासाठी वेगवेगळ्या आयपीएल टीममध्ये खेळणाऱ्या देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), चेतन सकारिया (Chetan Sakariya), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), नितीश राणा (Nitish Rana) आणि कृष्णप्पा गौतम (K. Gowtham) या 6 खेळाडूंची पहिल्यांदाच टीममध्ये निवड करण्यात आली आहे.
आयपीएल स्पर्धेत केकेआरकडून (KKR) खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा दोन वेळा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र खराब फिटनेसमुळे त्याने आजवर पदार्पण केलेले नाही. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) ओपनर ऋतुराज गायकवाड देखील ब्लू जर्सीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
सौराष्ट्रचा फास्ट बॉलर चेतन सकारियाची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. चेतननं आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित होण्यापूर्वी त्याने सर्वांनाच प्रभावित केले होते. चेतनने या आयपीएल सिझनमध्ये 7 मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वन-डे मॅचची सीरिज 13 जुलैपासून सुरू होईल. दुसरी वन-डे 16 तर तिसरी वन-डे 18 जुलै रोजी होणार आहे. तर टी 20 सीरिज 21 ते 25 जुलै दरम्यान होणार आहे. सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळले जातील.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया
नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह