WhatsApp Chat होणार आणखीनच सुरक्षित ; माहिती पहा या जबरदस्त फीचरबाबत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जून । WhatsApp वर युजर्स आपल्या चॅट, फोटो, व्हिडीओबाबत अतिशय सजग असतात. अशात End-to end encrypted अतिशय उपयोगी ठरतं. परंतु आता WhatsApp युजर्सचं चॅट आणखीनच सेफ होणार आहे. आता WhatsApp त्यांच्या फीचरमध्ये End-to end encrypted बॅकअप ऑप्शन सामिल करणार आहे. या फीचरच्या टेस्टिंगवर सध्या काम सुरू आहे. हे फीचर लाँच झाल्यानंतर WhatsApp Chat अधिकच सुरक्षित होणार आहे.

रिपोर्टनुसार, WhatsApp Chat सेफ ठेवण्यासाठी कंपनी 64-डिजीट एन्क्रिप्शन टेक्निकचा वापर करत आहे. WhatsApp चॅट बॅकअप एन्क्रिप्ट करण्यासाठी कंपनी हेक्साडेसिमलचा उपयोग करू इच्छिते. ही सुविधा युजरच्या चॅट बॅकअपला Google ड्राईव्हवर पासवर्डसह सुरक्षित ठेवेल, ज्यामुळे Facebook, WhatsApp, Google किंवा Apple सह शेअर केलं जाणार नाही.

ज्यावेळी युजर एखाद्या डिव्हाईसवर WhatsApp रिस्टोर करतो, त्यावेळी ते डिक्रिप्ट करण्यासाठी रजिस्टर्ड पासकोड टाईप करण्यासाठी सांगितलं जातं. कोणीही याचा कंटेंट पाहू शकत नाही, कारण End-To-End Encryption याला अनऑथराईज्ड अॅक्सेसने दूर करतो.एका रिपोर्टनुसार, जर तुम्ही पासवर्ड विसरलात, तर WhatsApp एन्क्रिप्टेड एंड-टू-एंड बॅकअप रिस्टोर करण्यासाठी युजरची मदत करू शकेल. WhatsApp एक रिकव्हरी Key बनवेल, युजर पासवर्ड विसरल्यास त्यावेळी रिकव्हरी Key चा वापर करुन बॅकअप रिस्टोर करता येऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *