Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळेतील प्रवेशोत्सवाला विद्यार्थी, शिक्षक मुकणार - Maharashtra 24

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळेतील प्रवेशोत्सवाला विद्यार्थी, शिक्षक मुकणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जून । यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होणार आहे. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला जातो; पण विद्यार्थ्यांच्या स्वागताला शिक्षक सलग दुसऱ्या वर्षीही मुकणार आहेत.कोरोनाचा राज्यातील प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीनेच सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे. शाळांची प्रत्यक्षातील घंटा वाजण्यास आणखी २ ते ३ महिने लागू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याने बाजारातील शैक्षणिक साहित्य खरेदीचे वातावरण थंडावलेले दिसत आहे. पालकांना आपल्या पाल्यासाठी यंदा वह्या-पुस्तके, दप्तरे, पाण्याच्या बाटल्या, गणवेश आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी घाई करावी लागणार नाही. परिणामी बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीचा उत्साहही फारसा दिसणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *