Petrol Diesel Price | पेट्रोलची महाराष्ट्रात शंभरी पार -डिझेलचे दर शतकाकडे , ; नवे दर काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) वाढत्या किंमतीमुळे दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे. तेल कंपन्यांनी आज (सोमवार, 14 जून 2021) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. देशात गेल्या 4 मेपासून सातत्याने इंधनाचे दर वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर हा 100 च्या पार पोहोचला आहे. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 14 June 2021)

इंधनाच्या वाढत्या दराचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसाठी कच्च्या तेलाचे दर जबाबदार आहे, असा दावा सरकारकडून केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जगात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचा दर वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे, देशांतर्गत तेल कंपन्या आधारभूत किंमत निश्चित करतात. यानंतर त्यावर परिवहन शुल्क, कर, डिलर कमिशन आकारला जातो. यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शहरांनुसार बदलतात.

अहमदनगर ₹ 102.27 ₹ 92.91
अकोला ₹ 102.13 ₹ 92.80
अमरावती ₹ 102.72 ₹ 93.37
औरंगाबाद ₹ 103.54 ₹ 95.63
भंडारा ₹ 102.95 ₹ 93.60
बीड ₹ 102.73 ₹ 93.36
बुलडाणा ₹ 102.90 ₹ 93.55
चंद्रपूर ₹ 102.45 ₹ 93.12
धुळे ₹ 102.64 ₹ 93.28
गडचिरोली ₹ 103.40 ₹ 94.03
गोंदिया ₹ 103.67 ₹ 94.28
मुंबई उपनगर ₹ 102.46 ₹ 94.54
हिंगोली ₹ 103.65 ₹ 94.27
जळगाव ₹ 103.25 ₹ 93.85
जालना ₹ 103.55 ₹ 94.15
कोल्हापूर ₹ 102.52 ₹ 93.18
लातूर ₹ 103.19 ₹ 93.81
मुंबई शहर ₹ 102.30 ₹ 94.39
नागपूर ₹ 102.50 ₹ 93.16
नांदेड ₹ 104.44 ₹ 95.02
नंदूरबार ₹ 103.35 ₹ 93.96
नाशिक ₹ 102.74 ₹ 93.37
उस्मानाबाद ₹ 102.80 ₹ 93.44
पालघर ₹ 102.49 ₹ 93.09
परभणी ₹ 104.44 ₹ 95
पुणे ₹ 101.96 ₹ 92.61
रायगड ₹ 102.72 ₹ 93.31
रत्नागिरी ₹ 103.66 ₹ 94.27
सांगली ₹ 102.42 ₹ 93.08
सातारा ₹ 102.70 ₹ 93.32
सिंधुदुर्ग ₹ 103.75 ₹ 94.36
सोलापूर ₹ 102.26 ₹ 92.92
ठाणे ₹ 101.77 ₹ 92.40
वर्धा ₹ 102.26 ₹ 92.93
वाशिम ₹ 102.81 ₹ 93.46
यवतमाळ ₹ 102.51 ₹ 93.18

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *