अदानी’च्या शेअर होल्डर्ससाठी ‘काळा सोमवार’ ; सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । अदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या शेअरहोल्डरसाठी आजचा दिवस काळा दिवस म्हणून उगवला. कारण अदानी ग्रुप ऑफ कंपनीच्या सहा लिस्टेड कंपन्यांपैकी साही कंपन्यांचे शेअर्स आज मजबूत कोसळून थेट लोअर सर्किटला लागलेले पाहायला मिळाले. याला कारण ठरलंय ते म्हणजे (NDSL) नॅशनल डिपॉझिटरी सिक्युरिटी लिमिटेडने केलेली मोठी कारवाई.

NDSL ने अदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या महत्त्वाच्या तीन परदेशी गुंतवणूकदार फंड्सवर कारवाई केली आहे. NDSL ने या तीनही फंड्सचे ट्रेडिंग अकाउंट्स गोठवले आहेत. ज्यामुळे आज अदानी गृप ऑफ कंपनीच्या शेअर्सवर मोठा भूकंप आल्याचं पाहायला मिळालं.

दुपारी १.३० वाजेपर्यंत किती पकोसळलेत अदानीचे शेअर्स

१. अदानी एंटरप्राइज (Adani Enterprises) या कंपनीचे शेअर्स तब्बल ११.१५ टक्क्यांनी कोसळून १४२५ ते १४३० प्रति शेअरच्या घरात ट्रेड करत होते

२. अदानी पोर्ट्स (Adani Ports) या कंपनीचे शेअर्स ११.८२ टक्के कोसळून प्रति शेअर ७३५ ते ७४० घ्या घरात ट्रेड करत होते.

३. अदानी ग्रीन्स (Adani Greens) या कंपनीचे शेअर्स ५ टक्के कोसळून ११५६.९० रुपये प्रति शेअर वर आले होते.

४. अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) या कंपनीचा शेअर देखील ५ टक्के कोसळून १५२२.५० रुपये प्रति शेअरवर आलेला पाहायला मिळाला

५. अदानी पॉवर (Adaani Power) या कंपनीत देखील कमालीची मंदी पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर कोसळून १४०.९० रुपयांवर आला.

६. अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) या कंपनीचा शेअर देखील ५ टक्के कोसळून १५४४ .९० रुपयांवर आलेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *