जागतिक रक्तदान दिन ; जास्तीत जास्त लोकांनी स्वतःहून रक्तदानासाठी पुढे यायला हवे ; आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । 14 जून जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदानाची चळवळ जोमाने पुढे जावी व “नातं रक्ताचं”या कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ता भाऊराव देवतरसे यांनी खिवसरा कंपाऊंड, रामनगर चिंचवड. येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली. कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशात रक्ताची कमतरता असल्याने अनेकांचे जीव वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे अशा वेळी रक्तदान सारखे श्रेष्ठ दान करून आपण देशसेवेची आणि राष्ट्रभक्तीची भावना मनात ठेवून आपले मूलभूत कर्तव्य पार पाडले पाहिजे, तसेच कोरोना चा संसर्ग काहीसा कमी झाल्यावर गेले तीन-चार महिने रखडलेल्या शस्त्रक्रिया यावरील उपचार आता सुरू होतील त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासेल त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी स्वतःहून रक्तदानासाठी पुढे यायला हवे असा सामाजिक संदेश आमदार अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या वेळी रक्तदात्यांना स्टीमर भेट वस्तू म्हणून देण्यात आले .

यावेळी कार्यक्रम स्थळी मा.गणेश आप्पा सातपुते, मा. जगदीश शेट्टी, मा.सचिनभाऊ चिखले, मा तुषार हिंगे, मा.रुपेश भाऊ पटेकर, मा.हेमंत भाऊ डांगे, मा .चंद्रकांत बाळा दानवले , मा .विशाल भाऊ मानकरी, मा.राजूभाऊ सावले, सौ अश्विनी ताई बांगर. यांनीदेखील आपली उपस्थिती दर्शवली. या रक्तदान शिबिरास साठी विशेष सहकार्य- विघ्नहर्ता मित्र मंडळ, स्वराज्य ढोल ताशा मंडळ,समता मित्र मंडळ, श्रीकृष्ण ग्रुप, त्रिमूर्ती मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, दिपाली मंडप, अखिल मोहन नगर शिवजयंती उत्सव समिती व परिसरातील सर्व मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *