महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । जागतिक रक्तदाता दिना निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील काही मोजक्या संस्था , प्रतिष्ठान रक्तदाता , रक्तदान शिबिर संयोजक व आयोजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म्हाडा मोरवाडी येथील कै.नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दिपक ज्ञानदेव भोजने यांचा प्रशस्तिपत्रक व गौरव चिन्ह वायसीएमएच रुग्णालयाचे अधिष्ठाता श्री राजेश वाबळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री दिपक भोजने यांच्या आईचा मुत्यृ २०१५ साली झाला आईच्या पहिल्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर करण्याचे ठरविले गेल्या सहा वर्षांपासून म्हाडा मोरवाडी परिसरात भोजने परिवार त्याच्या सहकारी मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमाच्या वेळी रक्तपेढीचे प्रमुख श्री डाॅ तुषार पाटील डाॅ गायकवाड सर श्री डाॅ मोसलगी सर ,श्री गणेश लांडे व इतर प्रतिष्ठानचे , संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते सूत्र संचालन श्री किशन गायकवाड यांनी केले.