महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जून । कोरोना काळातील निर्बंधांमुळे लोक घरातच अडवून पडले. या काळात लोकांनी नवनवे छंद जोपासले. बागकाम करणे, फुलझाडं लाकणे (फ्लोरिकल्चर) हा त्यापैकीच एक छंद. बागकामाच्या छंदाचे रुपांतर उद्योगात करण्याची किमया साधली आहे श्रीनगरच्या शाहीद भट या तरुणाने. आज एक यशस्वी फ्लोरिकल्चरिस्ट अशी ओळख त्याने निर्माण केली आहे. त्यासाठी पुणे येथून घेतलेले बागकामाचे शिक्षण त्याच्या कामी आले आहे.
कश्मीर खोऱयात फ्लोरिकल्चर आणि गार्डनिंगचा उदय होत आहे. कश्मीरमध्ये फुलांची प्रदर्शने आधी होतीच, पण आता मागणी काढली आहे. लोक दुर्मीळ वनस्पतींची मागणी करत आहेत. अगदी 100 ते एक लाख रुपयांपर्यंतची फुले खरेदी करण्यास तयार आहेत. त्यामुळे अधिक लोक या व्यवसायात येत असल्याचे शाहीद भट याने सांगितले. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शाहीद कुटुंबाचा फ्लोरिकल्चर व्यवसाय सांभाळू लागला. हायब्रीड आणि बोन्साई वनस्पतीबद्दल फारशी माहिती त्याला नव्हती. या वनस्पतींबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याने पुण्यातील एका संस्थेतून तसेच पंजाबमधील नर्सरीमधून कोर्स केला. त्यानंतर वडिलांकडून कोणतीही मदत न घेता व्यवसाय सुरू केला. आज शाहीदकडे 120 प्रकारची ‘इनडोअर’ आणि 300हून अधिक ‘आऊटडोअर’ जातीची रोपं आहेत.
फुलांचा व्यवसाय आज जम्मू-कश्मीरात ट्रेंडीगमध्ये आहे. मागील एका वर्षात सुमारे 75 टक्के नवीन रोपकाटिका सुरू झाल्या आहेत. स्पर्धा वाढत आहे. तरुणांमध्ये फुलझाडे लावण्याची आकड निर्माण झाली आहे. माझ्याकडे भरपूर ‘हायब्रीड’ रोपं आहेत. मी अन्य देशांतून फुले आयात करतो, असे शाहीद भट याने सांगितले.