महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जून । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा एकदा वाढ झाली. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये या दोन्ही इंधनाच्या दरांनी दरवाढीचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. इथे डिझेलच्या दराने शंभरी गाठली असून पेट्रोल 107 रुपये प्रति लिटर झाले आहे. देशात 7 राज्ये अशी आहेत, जिथे पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.