महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जून । वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात दाखल, मराठा आरक्षण आंदोलनस्थळी छत्रपती शाहू महाराजांना नमन, काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. मी आधीही सांगतोय आणि आताही सांगतोय आमचा मराठा आंदोलनाला पाठिंबा असणार आहे, असं यावेळी ते म्हणाले.
तसेच सरकार कमी पडलं म्हणून ही परिस्थिती उद्भवली. आता ज्याने आरक्षण मिळेल असा चांगला मार्ग सरकारने निवडावा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आरक्षणाबाबत जुन्या-नवीन सरकारने ज्या दक्षता घ्यायला हवी होती ती घेतली गेलेली नाही, असंही ते म्हणाले.