महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जून । सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी आम जनतेला काहीसा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली नाही. बुधवारी पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 14 पैशांनी ( प्रति लिटर) वाढले होते. त्यामुळे पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला होता तर अनेक शहरात डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.
5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 26 वेळा पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारात काच्चा तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. तरी देखील तेलाच्या वाढत्या दराने आम जनता त्रस्त झाली आहे.
हे आहेत पेट्रोलचे आजचे दर
दिल्ली : 96.66 रुपये प्रति लिटर
मुंबई : 102.86 रुपये प्रति लिटर
चेन्नई : 97.91 रुपये प्रति लिटर
कोलकाता : 96.58 रुपये प्रति लिटर
बेंगळूर : 99.89 रुपये प्रति लिटर
लखनऊ : 93.88 रुपये प्रति लिटर
श्रीगंगानगर : 107. 26 रुपये प्रति लिटर
हैदराबाद : 100.46 रुपये प्रति लिटर
डिझेलचे आजचे दर
दिल्ली : 87.41 रुपये प्रति लिटर
मुंबई : 95.84 रुपये प्रति लिटर
चेन्नई : 92.04 रुपये प्रति लिटर
कोलकाता : 90.25 रुपये प्रति लिटर
बेंगळूर : 92.66 रुपये प्रति लिटर
जयपूर : 96.38 रुपये प्रति लिटर
श्रीगंगानगर : 100.35 रुपये प्रति लिटर
हैदराबाद : 95.28 रुपये प्रति लिटर