महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जून । भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 20 मे 2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. (Legendary Indian Sprinter Flying Sikh Milkha Singh Passed Away)
मिल्खा सिंग यांनी 4 वेळी सुवर्ण पदकं जिंकली होती. 1960 साली ऑलम्पिक (Olympic) मध्ये चौथं स्थानं मिळालं होतं. त्यानंतरही त्यांनी ऑलम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.