महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २० जून – आषाढी एकादशीला पालखीसोबत अश्व आणायला परवानगी द्या, अशी मागणी सध्या वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुखांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. ही मागणी करत असताना आम्ही तबलीगी नाही किंवा कुंभ मेळाव्याती साधू नाही, आम्ही वारकरी आहोत, असंही वारकऱ्यांनी म्हटलं आहे. आळंदी देवस्थान पालखी सोहळा प्रमुख आणि वारकऱ्यांची सध्या एक महत्त्वाची बैठक सुरु आहे. वारकरी, आषाढी सोहळ्यातील दिंड्यांचे प्रमुख आणि विश्वस्त यांच्यात महत्त्वाची बैठक सुरु आहे. आषाढी वारीवरुन या सर्वांमध्ये एकमत नसल्याचं दिसून येत आहे.