सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी पैसा लावण्याची सुवर्णसंधी ! कमाईसाठी ही स्ट्रॅटेजी वापरा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २० जून – Gold buying Strategy अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने 2023 पर्यंत 2 वेळा व्याज दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. व्याज दरांमध्ये होणाऱ्या संभावित वाढीमुळे डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आली आहे. तसेच सोने चांदीमध्ये विक्री आणि निर्गुतवणूक दिसून आली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या घोषणेनंतर सुरक्षित गुंतवणूक मानले जाणाऱ्या सोन्याच्या किंमतीत 2.5 टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 1820 डॉलरच्या आसपास सोने ट्रेड करीत आहे. तर भारतीय बाजार म्हणजेच MCXमध्ये सोने 47 हजार रुपये प्रति तोळ्याच्या खाली गेले आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या भाव दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी उत्तम आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी पैसा लावण्याची सुवर्णसंधी आहे.

IIFL सेक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे की, अमेरिकी मध्यवर्ती बँकेच्या निर्णयामुळे डॉलर इंडेक्समध्ये तेजी येण्याचे संकेत आहेत. बॉन्ड यील्डमध्येदेखील वाढ दिसू शकते. डॉलरच्या मजबूतीमुळे रुपयाची घसरण होऊ शकते. यामुळे सोन्याच्या भावावर कमी कालावधीसाठी दबाव दिसू शकतो. शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांनी 47200 रुपयांवर सोने आल्यास नफा वसूली करावी. त्यासाठी 46500 रुपयांवर स्टॉपलॉस लावावा.

अनुज गुप्त यांचे म्हणणे आहे की, लॉंग टर्मच्या दृष्टीने सोन्याचा सध्याचा भाव गुंतवणूकीसाठी उत्तम आहे. जगात कोविड 19 चे केसेस दररोज वाढत आहेत. तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अर्थव्यवस्थेसोबतच महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या दिवसांमध्ये दसरा दिवाळीच्या वेळी सोन्याची मागणी वाढू शकते. वर्षाच्या शेवटपर्यंत सोने 53 हजार रुपये प्रति तोळे स्तर गाठू शकते. हा स्तर ब्रेक झाला तर सोने 55 हजार प्रतितोळेपर्यंत पोहचू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *