महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जून । हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. विशेष म्हणजे पहिली वटपौर्णिमा नववधूंसाठी खास असते. त्यामुळे या दिवशी त्या नटूनथटून वडावर पुजा करण्यासाठी जातात. म्हणूनच, ही पूजा कशी करायची? किंवा या पुजेला कोणतं साहित्य लागतं?
वट पौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य
सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती,धूप- दीप-उदबत्ती, तूप,पाच प्रकारची फळं,फुले,दिवा,वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा,पाणी भरलेला लहान कलश,हळद – कुंकू,पंचामृत,हिरव्या बांगड्या,शेंदूर,एक गळसरी,अत्तर,कापूर,पूजेचे वस्त्र,विड्याचे पाने,सुपारी,पैसे,गूळ खोबऱ्याचा नैवेद्य,आंबे,दूर्वा,गहू
वट पौर्णिमा व्रत शुभ मुहूर्त
वट पौर्णिमा व्रत: 24 जून 2021
पौर्णिमा तिथी प्रारंभ: 24 जून सकाळी 03.32 वाजता
-पौर्णिमा तिथी समाप्ती: 25 जून सकाळी 12.09 वाजता
नववधूसांठी आजचा दिवस खास
लॉकडाऊनच्या काळातही अनेकांनी लग्न केली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाच्या दिवशी मंगळसूत्र उलटं घातलं जातं. त्यानंतर शुभ दिवस बघून ते सुलटं म्हणजे सरळ केलं जातं. या विधी करता आजचा दिवस शुभ आहे. तसेच नववधूची ही पहिली वटपौर्णिमा असेल तर आजचा दिवस खास आहे. फक्त बाहेरची कोरोनाची परिस्थिती पाहता महिलांनी योग्य ती काळजी घेत वट पौर्णिमा साजरी करावी.