राशीभविष्य: या राशींवर आज लक्ष्मी माता प्रसन्न ; आजचं 12 राशींचं भविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून ।

मेष

गेले दोन दिवस मानसिक ताण जाणवत असेल तो आता कमी होईल. पूजेत मन रमेल. घरात कोणाशी शाब्दिक चकमक उडाली तरी काळजी नको. घरात अचानक बदल करण्याची इच्छा होईल. त्यासाठी कष्ट कराल.

वृषभ

आज आपण थोडे जपून रहा . अष्टमात चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य बिघडवते. राशीतील बुध राहू संभ्रमात पाडतील.कामाच्या ठिकाणी जपुन वागा. बहीण भावंड विनाकारण नाराज होतील. दिवस मध्यम आहे.

मिथुन

आज आर्थिक नियोजन करण्याचे विचार, सध्या जरा सांभाळून करा. नुकसान होणार नाही अशीच गुंतवणूक करा.धनस्थानातील शुक्र आणि शुभ चंद्र आज उत्तम फळ देण्यास सज्ज आहेत जोडीदारासोबत दिवस आनंदाने व्यतीत करा.

कर्क

अति कामाचा ताण घेऊ नका. जोडीदार कधीतरी नाराज होईल. ग्रहस्थिती फारशी अनुकूल नाही. पण लवकरच ठीक होईल. राशीतील मंगळ चंद्राशी षडाष्टक करीत आहे. जपून रहा प्रकृती सांभाळा. मारुतीची उपासना करणे योग्य.

सिंह

व्यय स्थानातील शुक्र मंगळ नाहक खर्च किंवा चैनी कडे कल दाखवत आहेत. तिकडे लक्ष असू द्या. या राशीच्या व्यक्ती आज आनंदी असतील. नाव लौकिक वाढेल. मुलांकडे लक्ष असू द्या. दिवस चांगला .

कन्या

आज तर सगळा वेळ घरासाठी काही विशेष काम कराल. एकूण दिवस चांगला आहे.तुम्हाला तसाच घराचा ओढा जास्ती असतो पण मुलांशी वाद नको. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी खर्च करावा लागेल.

तुला

काही महत्त्वाचा संवाद आज घडू शकतो. फोन ईमेल, याद्वारे जन संपर्क घडेल. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.छोटे प्रवास, त्याची तयारी, किंवा आखणी करण्यात आजचा दिवस घालवाल.

वृश्चिक

घरासाठी काही वस्तूंची खरेदी कराल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर कमीच होते. आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख समाधान यात आज वाढ होईल. खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील.थोडक्यात आणि सौम्य बोला. शुभ दिवस.

धनु

राशीतून होणारे चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य देईल. अष्टम मंगळ शुक्र आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी कडे लक्ष द्या. अति खर्च,प्रवास नको.आर्थिक स्थिती ठीक राहील. गृहसौख्य मिळेल. दिवस चांगला.

मकर

आज दिवस फारसा अनुकूल नाही. शनी मंगळ प्रतियोग, व्यय स्थानातील चंद्र व पंचमात राहू , सांभाळून रहा असे सुचवत आहे. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या साठी काही निर्णय घ्यायचे असतील तर घ्या. दिवस मध्यम आहे.

कुंभ

दिवस लाभ मिळवुन देणारा आहे. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. मुलांना वेळ द्यावा लागेल. त्यासाठी काही खर्च ही होईल. धार्मिक कार्या मध्ये मन रमेल. नियमाने उपासना करा.

मीन

नौकरी व्यवसायात आज फार दगदग होणार आहे. मंगळ शुक्र कोणी नवीन व्यक्तीची भेट दर्शवतात. दिवस भर कामाचा ताण राहील. धार्मिक बाबी किंवा पूजा यासाठी खर्च होईल. त्याची तयारी कराल. दिवस चांगला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *