महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना (Paranjape Builders) मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणुकीच्या आरोपाखाली श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दोघांना पुण्यातील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं. (Mumbai Police Arrested Pune Builders Shrikant Paranjape Shashank Paranjape in cheating case)
70 वर्षीय महिलेची तक्रार
विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वसुंधरा डोंगरे नावाच्या 70 वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. जागेबाबत कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. बिल्डर बंधूंना मुंबई पोलिसांनी पुण्यातून मध्यरात्री विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणलं.
फसवणूक केल्याबाबत गुन्हा
परांजपे बंधूंसह चार जणांवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम 476, 467, 68, 406, 420,120 ब अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोटी कागदपत्र बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. बिल्डर श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे या दोघा बंधूंना ताब्यात घेऊन विलेपार्ले पोलीस पुढील तपास करत आहेत.