महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । २५ जून १९८३ रोजी वेस्ट इंडिजला हरवून भारत एकदिवसीय क्रिकेट मधील विश्वविजेता झाला.भारताचे कर्णधार कपिलदेव रामलाल निखंज यांनी संघाच्या सहकार्याने ही स्वप्नवत कामगिरी केली. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी झिम्बाब्वे या नवशिक्या संघाने भारताची अवस्था ५ बाद सतरा अशी केली होती. भारत हरणार आणि स्पर्धेबाहेर जाणार अशीच परिस्थिती होती.
अशा वेळी कपिलदेव यांनी त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च अशा १७५ धावांची खेळी खेळली. सामना एकहाती फिरवून कपिलदेव यांनी अष्टपैलू खेळाचे दर्शन घडविले. अंतिम सामन्यात मोहिंदरसिंग यांनी स्वत:चा ठसा उमटविला. विंडीजचे तीनदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले.