महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi) अनेक भाविक चतुर्थीचं व्रत करतात. हिंदू पंचांगानुसार (Hindu Pancheng) आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. या संकष्ट चतुर्थीचं व्रत सूर्योदयापासून सुरू होतं आणि चंद्रोदयानंतर अर्ध्या दिल्यानंतर संपतं. यावेळी रविवारी 27 जूनला कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी आहे.
या दिवशी पूर्ण दिवस उपवास (Fasting) करावा. फळं, पाणी, दूध, फळांचा रस घ्यावा. चंद्राच्या दर्शनानंतर व्रत सोडावं.
रविवारी 27 जूनला आषाढ महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला संध्याकाळी 03.54 मिनिटांनी ही चतुर्थी सुरू होऊन 28 जूनला सोमवारी 02.16 पर्यंत हा चतुर्थीचा योग असणार आहे. संकष्ट चतुर्थीचं व्रत 27 जूनला असेल. या दिवशी 09.05 मिनिटांनी चंद्रोदय होईल मात्र, त्यानंतर देखील 28 जून सोमवारपर्यंत रवीवती संकष्टी चतुर्थीचं व्रत असेल.