महाराष्ट्र 24- पिंपरी चिंचवड महानगरपालिका-यशवंतराव चव्हाण स्मती रूग्णालय आंतरगत विभाग
वायसीएम रूग्णालयात ‘कोरोना व्हायरस’च्या संशयित पिंपरी चिंचवड महापालिकेने
‘कोरोना व्हायरस’च्या संशयित रूग्णांसाठी अतिदक्षता कक्ष सुरु केला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये तातडीने संशयीत कोरोना रुग्णांसाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाला (नवीन कोरोना आयसोलेशन वार्ड) असे नाव देण्यात आले आहे. येथे १५ रूग्णांच्या बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.
चीनमध्ये ‘कोरोना व्हायरस’ने थैमान घातले आहे. भारतात
देखील हा व्हायरस दाखल होण्याची शक्यता आहे.
त्याबाबतची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड
शहरात असंख्य नागरिक बाहेरून येत असतात. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये
नवीन कोरोना विषाणू रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष तत्काळ
स्थापन करावा. तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत
या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी योग्य त्या
उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी भाजपाचे
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली होती. वाघेरे यांनी
महापालिका आयुक्तांकडे वारंवार यासंदर्भात पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने या व्हायरसचा धोका लक्षात
घेऊन संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयामध्ये
संशयित कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष स्थापन केला
आहे.