सर्व विद्यापीठांचे शुल्क कमी होण्याची शक्यता, आज बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून ।राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व विद्यापीठांना ‘ट्युशन फी’ वगळून इतर शुल्क कमी करता येऊ शकते का, याबाबत सोमवारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, जिमखाना, ग्रंथालय आदी गोष्टींचा लाभ विद्यार्थी घेत नाहीत. त्यामुळे हे शुल्क कमी करावे, अशी मागणी केली जात होती. त्यावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे २६ हजार रुपये शुल्क कमी करण्यात आले. राज्यातील सर्व विद्यापीठांना याबाबत आवाहन केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले, राज्यात व्यावसायिक

@ १ ते १५ सप्टेंबरदरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, अशा एआयसीटीईच्या सूचना आहेत.
@ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी होईल.
@ अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी घ्यावी किंवा नाही, याचा निर्णय बारावीची गुणपत्रिका हातात पडल्यावर गुणपत्रिकेचा अभ्यास करून घेतला
जाणार आहे.
@ तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणपत्रिकेच्या आधारे केले जातील, असेही सामंत यांनी सांगितले.

मानधन वाढविण्याचा प्रस्ताव
कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या थेअरी लेक्चरसाठी ६५० रुपये, तर पदव्युत्तर पदवीसाठी ७५० रुपये, तसेच शिक्षणशास्त्र व विधी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रतितास ७५० रुपये एवढे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर येत्या आठवडाभरात ३ हजार ७४ जागा भरण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल.
– उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *