निर्मला सितारमण यांची अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी मोठी घोषणा; विविध क्षेत्रांना दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । अर्थमंत्री निर्मला सितारमण(Nirmala Sitharaman) यांनी अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्राला मजबूत करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. याकरीता अर्थमंत्र्यांनी 50 हजार कोटी जारी केले आहे. कोरोना प्रभावित क्षेत्रांना 1.1 लाख कोटी कर्जाची गॅरंटीची घोषणा केली आहे.

एमरजन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीममध्ये अतिरिक्त 1.5 लाख कोटी रुपये जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता योजनेअंतर्गत फंडिंगला 4.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आपात्कालीन क्रेडिट लाइन गॅरंटी योजनेचा यावर्षी विस्तार केला. ECLGS 4.0 च्या अंतर्गत रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन प्रोडक्शन प्लांट लावण्यासाटी 2 कोटीपर्यंतच्या कर्जाला 100 टक्के गॅरंटी कवर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटी रुपये जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नॉन मेट्रो मेडिकल इंफ्रासाठी खर्च करण्यात येतील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक क्षेत्र प्रभावित आहेत. त्यांच्याकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे. त्या क्षेत्रांसाठी मदतीसाठी सरकार विचार करीत आहे.

पर्यटन क्षेत्रासाठी 11 हजाराहून अधिक नोंदणीकृत टूरिस्ट, गाइड यांना 10 लाख रुपयांच्या कर्जाला गॅरंटी देण्यात आली आहे. कर्जाची प्रोसेसिंग, प्रीपेमेंट चार्ज घेण्यात येणार नाही.

आत्मनिर्भर भारत योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश ज्यांची नोकरी गेली आहे त्यांना मदत करणे होय, 58 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना 22 हजार कोटींच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचाही विस्तार करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गरीबांना 5 किलो मोफत अन्नधान्य दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *