Health Care : तमालपत्र अनेक समस्यांवर अत्यंत गुणकारी,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जून । तमालपत्र आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तमालपत्रामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. मधुमेहाच्या रूग्णांने जर आपल्या दररोजच्या आहारात तमालपत्राचा समावेश केला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.

तमालपत्रामध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, पोटॅशियम, सेलेनियम, तांबे आणि लोह यासारखे अनेक प्रकारचे घटक असतात. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांची समस्या दूर करण्याचे कार्य करते, तर व्हिटॅमिन-सी आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवू शकते. या सध्याच्या कोरोना काळामध्ये तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे आहे.

तमालपत्राचा आहारात समावेश केल्याने अशक्तपणा कमी होण्यास होते. आपण कोणत्याही भाजी आणि राईसमध्ये तमालपत्राचा उपयोग करू शकतो. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

तमालपत्र हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर असते. तमालपत्राचा उपयोग अनेक साैदर्य उत्पादनात देखील केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *