‘डेल्टा प्लस’ची चिंता नको, फक्त नियम पाळा! आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जून । डेल्टा प्लसचे राज्यात जे 21 रुग्ण आढळले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असला तरी तो केवळ डेल्टा प्लसमुळे झाला असे म्हणता येत नाही. डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी डेल्टा प्लसची अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही, फक्त कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘सध्याच्या आकडेवारीच्या माहितीप्रमाणे जो एक मृत्यू झालेला आहे त्यामध्ये 80 वर्ष वय आणि अन्य आजार होते हे घटकदेखील कारणीभूत आहेत. डेल्टा प्लसच्या देशभरात 48 केसेस आहेत. सर्व जिह्यांना आता थर्ड लेव्हलचे निर्बंध लागू आहेत. कुठल्याही परिस्थितीत थर्ड लेव्हलचे निर्बंध पाळले गेले पाहिजेत अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यात जनतेनेदेखील सहकार्य करावे.’

 

राज्यातील ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती तसेच ज्यांचा लसीकरण केंद्रावर पोहोचणे शक्य नाही. अशा नागरिकांना त्यांच्या सोसायटीच्या आवारात किंवा इमारतीपासून जवळच्या ठिकाणी जाऊन लस घेणे शक्य व्हावे यासाठी मोबाईल लसीकरण व्हॅनद्वारे लसीकरण करता येईल का, याबाबत राज्य सरकार विचार करीत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *