मॉडर्नाच्या लसीला केंद्राची मंजुरी ; नागरिकांना उपलब्ध होणार चौथी लस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जून । हिंदुस्थानचा कोरोनाविरोधातील लढा आणखी भक्कम होणार आहे. केंद्र सरकारने अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिली आहे. मुंबईतील सिप्ला पंपनीला या लसीचे डोस आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन व स्पुटनिकनंतर उपलब्ध होणारी ही चौथी लस आहे.

सिप्ला पंपनीने मॉडर्ना लसीच्या आयात व मार्पेटिंगसाठी सोमवारी ड्रग्ज पंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) परवानगी मागितली होती. त्यावर डीसीजीआयने मंगळवारी आपत्कालीन वापरासाठी लसीच्या आयातीला परवानगी दिली. नीती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. ही लस स्तनपान करणाऱया महिलांसाठीही सुरक्षित आहे तसेच या लसीचा व वंध्यत्वाचा काहीही संबंध नाही, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने कोवॅक्सच्या माध्यमातून मॉडर्नाचे ठराविक डोस हिंदुस्थानला दान करण्याचे मान्य केले आहे. यासाठीही सिप्ला पंपनीला सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड पंट्रोल ऑर्गनायझेशनकडून परवानगी मिळणार आहे. तसेच ज्या लसींना मोठय़ा देशांनी तसेच जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे, त्या लसीच्या ब्रिजिंग ट्रायलची गरज नसल्याचे सरकारने एप्रिलमध्ये जाहीर केले होते. त्यानुसार मॉडर्ना लसीच्या ब्रिजिंग ट्रायलची गरज नसेल. मॉडर्ना पंपनीला आता केवळ देशात कायदेशीर संरक्षणाच्या हमीबाबत केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

देशात सध्या कोरोना लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा वापर केला जात आहे, तर रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचा आपत्कालीन परिस्थितीत वापर केला जात आहे. त्याचबरोबर डीआरडीओने पावडरच्या रूपातील ‘2-डीजी’ हे औषध बनवले आहे. यापाठोपाठ आता मॉडर्नाची लस येत आहे.

अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 120 दशलक्ष लोकांनी फायझर आणि मॉडर्नाचे डोस घेतले आहेत. त्यातील कोणालाही गंभीर स्वरूपाचा त्रास झालेला नाही. या लसींना श्रीमंत देशांनी पहिली पसंती दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *