महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) … राहुल द्रविड नंतरची भारतीय संघाची वॉल अशी त्याची ओळख… पण त्याची बॅट गेल्या दिवसांपासून मात्र शांत आहे. तिची जादू हरपली की काय? अशी शंका यावी… त्याच्या बॅटमधून शतक निघालेलं तवळपास दोन वर्ष झालंय… चमकदार कामगिरी करणाऱ्या पुजाराला नेमकं काय झालं? त्याच्या बॅटमधून धावा का निघत नाहीय, याची चर्चा आता सुरु झाली आहे. तर दुसरीकडे चेतेश्वर पुजाराचा पर्याय कोण असू शकतो, याचीही चर्चा सुरु आहे. अशातच एका फॅन्सच्या प्रश्नाला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाला दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉगने चेतेश्वर पुजाराच्या जागेसाठी मुंबईकर पृथ्वी शॉ अतिशय परफेक्ट असल्याचं म्हटलं आहे (Cheteshwar pujara could be replace by prithvi Shaw Says Australian Former Player Brad hogg)
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅग हॉगच्या मतानुसार, मुंबईकर पृथ्वी शॉ चेतेश्वर पुजाराची जागा घेऊ शकतो. चेतेश्वर पुजाराच्या जागी के एल राहुल खेळू शकतो का किंवा पुजाराचा पर्याय राहुल असेल का? असा प्रश्न एका फॅन्सने हॉगला विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने पृथ्वी शॉचं नाव घेतलं.
If anyone was going to replace Pujara it would be Prithvi Shaw. Feel he is more suited there than opening. Has a lot of talent and long future. He is not in the tour group but a wild card choice. #EngvIND https://t.co/8wEF82aq1A
— Brad Hogg (@Brad_Hogg) July 2, 2021
‘पुजाराची जागा कोण घेऊ शकतो तर त्याचं नाव पृथ्वी शॉच असेल. मला वाटते की, सलामीपेक्षा तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी अधिक चांगल्या प्रकारे खेळू शकेल. त्याच्याकडे खूप कौशल्य आहे आणि त्याचे भविष्य चांगलं आहे. तो इंग्लंड दौऱ्यात सामिल नाही, परंतु तो नक्कीच वाईल्ड कार्डची निवड आहे’, असं ब्रॅड हॉग म्हणाला.