सध्या श्रीलंकेत असलेला खेळाडू घेणार शुभमन गिलची जागा?

Spread the love

महाराष्ट्र २४ । पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलची (Shubman Gill) पायाची दुखापत गंभीर असून त्यामुळे त्याला किमान दोन महिने क्रिकेट खेळता येणार नाही. गिल जखमी झाल्यानं रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत ओपनिंग कोण करणार याची चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाकडे सध्या मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), के.एल. राहुल (KL Rahul) आणि अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Easwaran) हे तीन पर्याय सध्या टीम मॅनेजमेंटसमोर आहेत.

बंगालचा अभिमन्यू इश्वरन या सीरिजसाठीही स्टॅण्डबाय खेळाडू आहे. अभिमन्यूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 46.96 च्या सरासरीने 4,227 रन केले, यामध्ये 13 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तसंच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 49.18 च्या सरासरीने 2,656 रन केले. टी-20 क्रिकेटमध्येही इश्वरनची सरासरी 33.64 आहे. इंग्लंड दौऱ्यात आंतररष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या इश्वरनला खेळवण्याची जोखीम घ्यायची का ? असा निवड समितीचा प्रश्न आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार भारतीय टीम मॅनेजमेंटची पसंती पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आहे. पृथ्वी सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे, तो तिथून इंग्लंडला रवाना होऊ शकतो. बीसीसीआय (BCCI) याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी (ECB) चर्चा करण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर पृथ्वीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ केला होता. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 800 पेक्षा जास्त रन केले होते. आयपीएल स्पर्धेतही पृथ्वीनं आक्रमक बॅटींग करत दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात (DC) मोलाचे योगदान दिले होते. या कामगिरीनंतर त्याची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली. 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत तो कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) सोबत ओपनिंग करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *