नौदलात अर्ज करण्याची लिंक खुली झाली, लाखावर पगार ; BE/BTech उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । Indian Navy SSC Recruitment, Sarkari Nokari 2021: इंडियन नेव्हीने SSC (IT Officer) पदांसाठी योग्य उमेदवारांकडून रिक्त जागांवर अर्ज मागविले आहेत. BE/BTech उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीचे नोटिफिकेशन आधी जारी करण्यात आले आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. (Join Indian Navy 2021: Apply for SSC Officer posts on joinindiannavy.gov.in)

या भरती प्रक्रियेसाठीच्या महत्त्वपूर्ण तारखा पुढील प्रमाणे आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख १२ जून २०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२१

पदांचे विवरण:
भारतीय नौदलाने एसएससी अधिकारी वर्गातील एकूण ५० पदांसाठी अर्ज करण्यासाठी ब्रँच किंवा कॅडरनुसार पदांचे विभाजन केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.
– एसएससी जनरल सर्व्हिस (GS/X): ४७ पदे
– हायड्रो कॅडर: ३ पदे

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
-या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार बीई/बीटेक परीक्षेत कुठल्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असणे अनिवार्य आहे.
– या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा २ जानेवारी १९९७ नंतर आणि १ जुलै २००२ पूर्वी झालेला असणे आवश्यक आहे.

वेतन
भारतीय नौदलातील एसएससी अधिकाऱ्याच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल-१० नुसार ५६ हजार १०० पासून १ लाख १० हजार ७०० पर्यंत वेतन दिले जाईल.

-विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा…http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10701_4_2122b.pdf

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *