महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । इंग्लंडच्या फुटबॉल संघाने शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत युव्रेनचा 4-0 अशा फरकाने धुक्वा उडवला आणि युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. कर्णधार हॅरी केनने दोन तर हॅरी मॅग्वायर व जॉर्डन हेंडरसन यांनी प्रत्येकी एक गोल करीत इंग्लंडला दिमाखदार विजय मिळवून दिला. गॅरेथ साउथगेट यांच्या प्रशिक्षणाखाली फुटबॉलच्या रणांगणात उतरणाऱया इंग्लंडने तब्बल 25 वर्षांनंतर युरो फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला हे विशेष. आता घरच्या वेम्बली मैदानावर होणाऱया उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडला डेन्मार्कशी दोन हात करावे लागणार आहेत. इटली-स्पेन या दोन संघांमध्ये अन्य उपांत्य फेरीची लढत होईल.